Monday, 12 January 2015

#Post 2: Marathi Poem





                 रोज आपण नवीन  लोकांना  भेटतो,काहींना  विसरतो काहींना आपलेसे करतो . काही  होतात मित्र काही  राहतात परके , काही परके मित्रात बदलतात तर काही मित्र परके होतात .. खरंच काळ एवढा बदलतो??अन् काळाप्रमाणे व्यक्ती पण ??अनोळखी  पासून मैत्री  आणि  परत  अनोळखी  होण्यापर्यंतचा हा प्रवास मोजक्या कवितेच्या ओळींत.. 


 

मागे वळून पाहता आज बरेच काही जाणवले,
थोडे कमवले अन्  खुप काही गमवले..
 वाटले नव्हते कधी मित्र एवढे दुरावतील,
जवळचीच माणसे कायमची विसरावी लागतील ..
 अजुनही या धक्क्यातुन सावरते आहे ..
नव्या आयुष्याची नवी वाट शोधते आहे...

        Poem written by: Aishwarya Desai

         ©Aishwarya Desai

No comments:

Post a Comment