Wednesday, 6 May 2015

#Post 3: Equinox v15.3 एक अविस्मरणीय प्रवास

         Equinox हे नुसतं नाव जरी घेतलं तरी नविनच उत्साह संचारतो . दर वर्षी  के . के. वाघ अभियांत्रिकी  महाविद्यालयाच्या "Technical Event " ची शान असणारा इव्हेन्ट  म्हणजे Equinox . या वर्षी हा इव्हेन्ट सांभाळण्याची धुरा आम्हा तृतीय वर्षाच्या (TE) विद्यार्थ्यांवर होती . नेहमी पेक्षा या वर्षी काही तरी वेगळा करून दाखवायचा असा चंग बांधूनच कामाला सुरवात झाली .
         पहिले सेमिस्टर संपताच सुट्ट्यांमध्ये म्हणजेच  डिसेंबर  मध्ये योजना व आखणी करण्यास सुरवात झाली .  सुरवात लोगो, tagline , brochure, यापासून करायची ठरली . म्हणतात नं  जितके लोक तितके विचार अन जितके विचार तितक्या एकापेक्षा एक सुंदर कल्पना . अनेक विचारांती व सर्वसहमाताने  "Your Potential , Our Platform  "  हि tagline निश्चित झाली . Equinox मार्च २०१५ ला होणार असल्याने Equinox v 15.3 असा नाव ठरलं .  अनेक उत्कृष्ट लोगो पैकी एक अंतिम करण्यात आला .

                                                         
                                             Image : Equinox v15.3 Logo

                     आता तयारीच्या दुसऱ्या टप्प्याकडे जाण्याचा निर्णय झाला . परंतु अजूनही brochure design काही निश्चित झाले नव्हते .  तूर्तास दुसऱ्या टप्प्यातील कामे हाती घेण्यात आली . यात महत्वाचे होते ते  T-shirt , band व सगळ्यात महत्वाचे sponsorship. आता कामाची वाटणी केली गेली . काही जण  T-shirt व band चं बघत होते तर काही sponsorship . या बरोबरीनेच राहिलेले brochure चे काम हि चालू होते.
                     एव्हाना Decoration commity  सजावटी ची योजना करण्यात व्यस्त झाली होती .  या वर्षी काही तरी हटके करायचे हे ठरवून च कामाला सुरवात झाली होती  व सुमारे २ महिने हि सर्व तयारी चालू होती . प्रत्येक विद्यार्थी आपापल्या परीने मदत करत होता . याबरोबरच वेळोवेळी प्राचार्यांचे मार्गदर्शन जोडीला होतेच.

                                                               Image : पुर्वतयारी
                       
                       एव्हाना जानेवारी संपत आला होता . Logo , brochure , T -shirt यांचे काम जवळपास पूर्ण झाले होते . मात्र स्पोन्सोरशिप   व बाकी इव्हेन्ट कोण कोणत्या असणार हे ठरवायचे काम मात्र अजून ५०% बाकी होते .  याच दरम्यान युनिव्हर्सिटी  परीक्षा आल्याने काही काळ काम थांबण्यात आले . पण परीक्षा संपताच सगळे पुन्हा उत्साहाने कामाला लागले .
                        आता फ़ेब्रुवारी उजाडला होता . सर्व कामे अंतिम   टप्प्यात होती .  सर्वात महत्वाचे  HTC  हि प्रख्यात कंपनी आता आम्हाला स्पोन्सोर करणार होती . इव्हेन्ट पण   खालीलप्रमाणे  ठरवण्यात आले :-

 १. CODE-A-THON
 २. VIRTUAL CAMPUS
 ३. TECHNOHUNT
 ४. PHOT-ON
 ५. LAPTOP JUNKYARD
 ६.PROJECTRON
 ७. GALLERIA
 ८.  HACK-IT
 ९. PRESENT-IT

                           


        या या वर्षीचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे   Equinox चे Android App तसेच वेब-साईट http://equinox15.com/ . या बरोबरच  फेसबुक   पेज  वरही जोरात publicity करण्यात येत होती.   या पेज ला हजारहून हि अधिक लाईक्स आले आहेत  व व्हिडीओ  ला देखील You Tube  वर चांगला प्रतिसाद  मिळत होता .नाशिक व नाशिक बाहेरील कॉलेज मध्येही  भरपूर प्रचार करण्यात आला व दर  वर्षी पेक्षा या वर्षी सर्वाधिक प्रतिसाद मिळाला .
       


        ९ व १० मार्च तारीख निश्चित  करण्यात आली होती पण काही अपरिहार्य कारणांमुळे ती १२ व १३ मार्च करण्यात आली व पुन्हा बदलून १४ व १५ मार्च करण्यात आली .   गेल्या २ महिन्यांची मेहनत आता लवकरच फळास येणार होती . अखेर तो १४ तारखेचा दिवस उजाडला पण तो एका चिंते सह  आदल्या दिवशी रात्री सुरु झालेला पाऊस  काही करून थांबण्याचे नाव घेत नव्हता .  आम्ही मात्र सर्व volunteers  सकाळी ७ पासूनच हजार झालो होतो .  उद्घाटनाची वेळ जवळ येत होती पण पावसाचे सावट काही दूर होत नव्हते . अखेरीस साडे नऊ च्या सुमारास सूर्याने दर्शन दिले आणि सर्वांनाच हायसे वाटले .
                        
      
                             दहाच्या सुमारास प्रमुख पाहुणे व प्रसिद्ध  लेखक अनिल गोइल यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले . नंतर नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सर्व स्पर्धा उत्साहात  पार पडल्या . टेक्निकल स्पर्धा बरोबरच   ठिकठिकाणी लावलेले फोटो बूथ हि सर्वांच्या आकर्षणाचा विषय होते .
                          स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद व सर्व विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे हा इव्हेन्ट यशस्वीरीत्या पार पडला .
       
 

No comments:

Post a Comment