Friday, 4 March 2016

#Post4: पाऊस -एक आनंद

पावसाचं प्रत्येकाशी एक वेगळंच नातं असतं हेच नातं सांगण्याचा एक छोटा प्रयत्न ..

पाऊस .. तसा नेहमीच येणारा
सरींबरोबर वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारा ..
पाऊस .. तसा नेहमीच येणारा
सरींबरोबर वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारा ..

कधी धो-धो कोसळणारा
कधी उगीचच रेंगाळणारा..

पावसाच्या जश्या निरनिराळ्या अदा..
लोकांच्याहि तेवढयाच वेगवेगळ्या तर्हा..

काहीजण "I love rains" म्हणून
खिडकीतून पाऊस न्याहाळणार..
तर काही "I hate rains" म्हणूनसुद्धा
photography त मात्र त्याला टिपणार..

काही गाड्यांवर स्वार होऊन डोंगरदर्ंयात
निसर्ग सौंदर्य पाहणार ..
पण काही मात्र "किती हा चिख्खल!!" म्हणून
निसर्गालाच दोष देणार ..

काही हातात पेन घेऊन त्यावर कविता करणार
काही मात्र लगेच Instagram वर upload करणार ..

कुणी घेणार चहा, कुणी घेणार कॉफी
पण सोबतीला भजी मात्र सगळ्यांनाच हवी..

पाऊस येतो सोबत अनेक आठवणी आणतो..
जाताना मात्र काळ्या ढगांबरोबर मनातलं मळभही घेऊन जातो ..

पुर्वी कागदाच्या होड्यांमधुन येणारा पाऊस
आता #tag मधुन update होतो ..
पण कुणी काहीही म्हणा प्रत्येकाला
काही ना काही आनंद देऊन जातो ..

असाच एक पाऊस चला आज enjoy करुया..
मार्चमध्ये पण पावसाळा अनुभवुया..

©aishwaryadesai.blogspot.in 4/3/16

15 comments: